Letra Jeevlaga de Bela Shende

Letra de Jeevlaga

Bela Shende


Jeevlaga
Bela Shende
(0 votos)
जीवलगा खिन्न का? का? रे
काळाचे चक्र फिरेल संपेल रात्र संपेल

जाळीत दिशांना वाहे जणू काळोखाच्या लाव्हा
अंधार सागराला या जणू कोठे पैल नसावा
गाभ्यात परी तिमिराच्या तेजाचा कोंब फुटेल
संपेल रात्र संपेल
जीवलगा खिन्न का? का? रे
काळाचे चक्र फिरेल संपेल रात्र संपेल

घर सोडून जाता पक्षी वठलेला उरतो माळ
कंगाल पोरकी झाडे वर रीते रीते आभाळ
परी ओसाडीतून हिरवे चाहूल पुन्हा उगवेल
संपेल शिशिर संपेल
जीवलगा खिन्न का? का? रे
ऋतु रंग पुन्हा बदलेल संपेल शिशिर संपेल

संकटे ना अपुल्या हाती सोसणे आपुले काम
प्रितीच होई आधार प्रितीच खरा विश्राम
स्वर जागा होईल फिरुनी मन पुन्हा नवे होईल
प्रीतीची साथ असेल
जीवलगा खिन्न का? का? रे
प्रीतीची साथ असेल संपेल रात्र संपेल
जीवलगा खिन्न का? का? रे


Comparte Jeevlaga! con tus amigos.


Que tal te parece Jeevlaga de Bela Shende?
Pesima
Mala
Regular
Buena
Excelente