Cancion : Tav Naynanche Dal Artista : Salil Kulkarni Album : Sandhiprakashat Url : https://www.letras10.co/letra-tav-naynanche-dal-de-salil-kulkarni तव नयनांचे दल हलले ग! पानावरच्या दंवबिंदूपरी त्रिभुवन हे डळमळले ग! तारे गळले, वारे ढळले दिग्गज पंचाननसे वळले गिरि ढासळले, सूर कोसळले ऋषि-मुनि-योगी चळले ग! ऋतुचक्राचे आस उडाले आभाळातुनि शब्द निघाले, "आवर आवर अपुले भाले मीन जळी तळमळले ग!" हृदयी माझ्या चकमक झडली नजर तुझी धरणीला भिडली दो हृदयांची किमया घडली पुनरपि जग सावरले ग! ========================== Letra descargada de Letras10.co ==========================