Letra Mazya Govyachya Bhumit de Radha Mangeshkar

Letra de Mazya Govyachya Bhumit

Radha Mangeshkar


Mazya Govyachya Bhumit
Radha Mangeshkar
(0 votos)
माझ्या गोव्याच्या भूमींत गड्या नारळ मधाचे
कड्याकपारीमधोनी घट फुटती दुधाचे

माझ्या गोव्याच्या भूमींत उन्हाळ्यात खारा वारा
पावसात दारापुढे सोन्याचांदीच्या रे धारा

माझ्या गोव्याच्या भूमींत येते चांदणे माहेरा
ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा

माझ्या गोव्याच्या भूमींत गड्या साळीचा रे भात
वाढी आईच्या मायेने सोनकेवड्याचा हात

माझ्या गोव्याच्या भूमींत लाल माती, निळे पाणी
खोल आरक्त घावांत शुद्ध वेदनांची गाणी


Comparte Mazya Govyachya Bhumit! con tus amigos.


Que tal te parece Mazya Govyachya Bhumit de Radha Mangeshkar?
Pesima
Mala
Regular
Buena
Excelente